मी Google टोन कसे वापरू?

Google टोन वापरून URL प्रसारित करण्‍यासाठी:

  • आपल्या Google खात्यामध्‍ये लॉग इन करा.
  • वेबपृष्‍ठावर आपण प्रसारित करू इच्छिता तेव्‍हा आपल्‍या Chrome ब्राउझरमध्‍ये Google टोन चिन्हावर क्लिक करा.

Google टोन का?

Google टोन संगणकांना आपण करतो त्या प्रकारे—एकमेकांशी बोलून संप्रेषण करण्‍यात मदत करते. हा ब्राउझरचा विस्तार आहे जो URL म्हणून ओळखण्‍याकरिता इतर संगणकांच्या मायक्रोफोनसाठी Chrome ला एक विशिष्‍ट ध्वनी ओळख तयार करण्‍याकरिता आपल्या संगणकाचे स्पीकर वापरू देतो.

Google टोन कसे कार्य करते?

Google टोन आपल्या संगणकाचा मायक्रोफोन चालू करते (विस्तार चालू असताना). Google टोन तात्पुरती URL Google च्या सर्व्हरवर संचयित करते आणि ती इंटरनेटशी कनेक्‍ट केलेल्या जवळपासच्या संगणकांना पाठविण्‍यासाठी आपल्‍या संगणकाचे स्पीकर आणि मायक्रोफोन वापरते. ऐकण्‍याच्या टप्प्‍यामध्‍ये असलेला कोणताही संगणक ज्यावर Google टोन विस्तार स्थापित केलेला आणि चालू केला आहे तो Google टोन सूचना प्राप्त करू शकतो. सूचना आपल्‍या Google प्रोफाईल नाव आणि चित्रासह URL प्रदर्शित करेल.

Google टोन सह URL प्राप्त करण्यासाठी, Chrome ला आपला मायक्रोफोन चालू करणे आवश्‍यक असेल. Google टोन मोठ्‍या आवाजाच्या ठिकाणी, दूर अंतरावर, खराब इंटरनेट कनेक्शनसह किंवा मायक्रोफोनशिवाय किंवा Google टोन द्वारे प्रसारित होणारा आवाज ओळखण्‍यास असमर्थ असलेल्‍या मायक्रोफोनसह कार्य करू शकत नाही.

Google टोन माझा डेटा कसा वापरू शकते?

Google टोन Google च्या गोपनीयता धोरणानुसार अनामित वापर डेटा संकलित करते.

मी ते चालू आणि बंद कसे करू शकतो?

Google टोन (मायक्रोफोनसह) चालू आणि बंद करण्‍यासाठी, Chrome विस्तार सेटिंग्ज वर जा.

हे सुरक्षित आहे?

Google टोन केवळ URL प्रसारित करते, यामुळे प्राप्तकर्ते त्यांना सामान्यपणे प्रवेश नसलेल्या पृष्ठावर स्वयंचलितपणे प्रवेश मिळवत नाहीत. आपण आपली Gmail इनबॉक्स URL प्रसारित केल्यास, उदाहरणार्थ, Google टोन सूचनेवर क्लिक करतात त्या प्राप्तकर्त्यांना Gmail वर लॉग इन करण्यासाठी सूचित केले जाईल. तथापि, Google टोन प्रसारणे डिझाइन नुसार सार्वजनिक असतात, यामुळे गोपनीय माहितीची अदलाबदल करण्यासाठी त्यांचा वापर न करणे नेहमी उत्तम असते.